माहिममध्ये इमारतीचा भाग कोसळल्याने एक जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माहिममध्ये इमारतीचा भाग 
कोसळल्याने एक जण जखमी
माहिममध्ये इमारतीचा भाग कोसळल्याने एक जण जखमी

माहिममध्ये इमारतीचा भाग कोसळल्याने एक जण जखमी

sakal_logo
By

मुंबई, ता. ८ : माहीम परिसरात एका निर्माणाधीन इमारतीचा भाग नजीकच्या घरावर पडल्याने ५२ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (ता. ८) दुपारी दीडच्या सुमारास घडली. जहांगीर खान असे जखमी व्यक्तींचे नाव असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
माहीमच्या कापड बाजार परिसरात मेहरबानी कंपाऊंडमध्ये मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास एका निर्माणाधीन इमारतीचा भाग बाजूला असलेल्या एका घरावर पडला. घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले आणि जहांगीर शेख यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या शेख यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, इमारतीच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया माहीम पोलिसांकडून सुरू होती.