कामगार केंद्रात सॅनिटरी पॅड वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगार केंद्रात सॅनिटरी पॅड वाटप
कामगार केंद्रात सॅनिटरी पॅड वाटप

कामगार केंद्रात सॅनिटरी पॅड वाटप

sakal_logo
By

कांदिवली, ता. ८ (बातमीदार) ः मालाड पश्चिम, मालवणी येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र येथे महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. या वेळी प्लेज कंपनीचे अधिकारी शेन एलेक्स हे प्रमुख पाहुणे म्‍‍हणून उपस्‍थित होते. या वेळी परदेशी महिला मारिया व अन्‍ना यांच्या हस्ते पॅडचे वाटप करण्यात आले. ४० महिलांनी यामध्‍ये सहभाग घेतला. कामगार केंद्र मालवणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सोमवारी झालेल्‍या कार्यक्रमात महिलांना पॅडचे महत्त्‍व सांगून आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला. केंद्र संचालक के. डी. सोनावणे यांनी सर्वांचे स्वागत केले व कामगार कल्याण मंडळाच्या उपक्रमाची माहिती दिली.