बाल दिनानिमीत्त विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाल दिनानिमीत्त विविध कार्यक्रम
बाल दिनानिमीत्त विविध कार्यक्रम

बाल दिनानिमीत्त विविध कार्यक्रम

sakal_logo
By

मुलुंड, ता. ८ (बातमीदार) ः ब्रह्माकुमारी मुलुंड सब झोनतर्फे बालदिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता. १४) संध्याकाळी ५ वाजता दयानंद वैदिक स्कूल, चंदन बाग, मुलुंड पश्चिम येथे हे कार्यक्रम होणार आहेत. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून ब्रह्माकुमारी मुख्यालय माऊंट अबू येथील राजयोगी ब्रह्माकुमार डॉ. बी. के. मृत्युंजय यांची विशेष उपस्थिती असणार आहे आणि आशीर्वचन देण्यासाठी मुलुंड सब झोनच्या संचालिका राजयोगिनी डॉ. ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार मनोज कोटक आणि आमदार मिहिर कोटेचा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वेळी वयोगट १२ ते १५ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्‍या नाच-गाण्याचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला प्रवेश मोफत आहे. तरी सर्व मुलुंडकरांनी त्याला उपस्थित राहावे, असे आवाहन ब्रह्माकुमारी मुलुंड सब झोनतर्फे करण्यात आले आहे.