पनवेलमध्ये तरुणाचा अपघाती मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलमध्ये तरुणाचा अपघाती मृत्यू
पनवेलमध्ये तरुणाचा अपघाती मृत्यू

पनवेलमध्ये तरुणाचा अपघाती मृत्यू

sakal_logo
By

पनवेल, ता. ८ (वार्ताहर) : पनवेल येथे कार्यक्रमासाठी कुटुंबासह आलेल्या एका तरुणाचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री तळोजा येथे घडली. या अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला असून तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव सय्यद आवेस इस्माईल (वय २२) असे असून तो कुटुंबासह कल्याणमध्ये राहावयास होता. सय्यद आवेस व त्याच्या कुटुंबीयांना पनवेलमध्ये नवीन घर घ्यायचे होते. त्यामुळे आवेस व त्याचे कुटुंबीय रविवारी सायंकाळी पनवेल येथील कार्यक्रमासाठी कल्याण येथून दोन मोटरसायकलवरून आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आवेस व त्याचा लहान भाऊ मोहम्मद हुजेफा सय्यद हे दोघे मोटरसायकलवरून पनवेल-मुंब्रा हायवेने शिळफाटाच्या दिशेने जात होते. त्यांची मोटरसायकल आर. ए. एफ. सिग्नलजवळ आली असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात आवेस याचा जागीच मृत्यू झाला.