वसईत तालुक्यात आयुष्यमान, हेल्थकार्डचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत तालुक्यात आयुष्यमान, हेल्थकार्डचे वाटप
वसईत तालुक्यात आयुष्यमान, हेल्थकार्डचे वाटप

वसईत तालुक्यात आयुष्यमान, हेल्थकार्डचे वाटप

sakal_logo
By

वसई, ता. ९ (बातमीदार) : बहुजन विकास आघाडी नवघर माणिकपूर विभागातर्फे वसई पश्चिम लोकोपयोगी योजनांचा लाभ मिळावा, याकरिता शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात एक हजार १२८ नागरिकांनी लाभ घेतला. योजनेचे कार्डवाटपप्रसंगी बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते व माजी महापौर नारायण मानकर, माजी नगरसेवक विजय वर्तक, छोटू आनंद, दिलीप डाबरे उपस्थित होते.
शिबिरासाठी मितेश मोदी व निभा मोदी यांनी लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ मिळावा म्हणून सहभाग नोंदवित येणाऱ्या नागरिकांना माहिती दिली. या शिबिरात आयुष्यमान योजनेसाठी २०६, ईश्रम कार्ड १४३, हेल्थ कार्ड ३६८, पॅन कार्ड ३८, ज्येष्ठ नागरिक ११३, वोटिंग कार्डसाठी २६९ नागरिकांनी लाभ घेतला.
शासनाच्या विविध योजना या नागरिकांना मिळाव्यात, हा हेतू नेहमीच आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रयत्न केले आहेत. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाकाळातदेखील भरीव मदत करण्यात आली. विविध योजनेच्या कार्डमुळे ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्यांना याचा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन माजी महापौर नारायण मानकर यांनी केले.