भिवंडी महापालिकेतर्फे ५ डिसेंबरला लोकशाही दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडी महापालिकेतर्फे ५ डिसेंबरला लोकशाही दिन
भिवंडी महापालिकेतर्फे ५ डिसेंबरला लोकशाही दिन

भिवंडी महापालिकेतर्फे ५ डिसेंबरला लोकशाही दिन

sakal_logo
By

भिवंडी, ता. ९ (बातमीदार) : सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार महापालिका स्तरावरील लोकशाही दिन हा ५ डिसेंबर रोजी होणार असल्याने नागरिकांनी त्यांच्या तक्रारी दोन प्रतीत १८ नोव्‍हेंबरपूर्वी माहिती व जनसंपर्क विभागाकडे पाठवणे आवश्यक आहे. लोकशाही दिनी अर्जदार यांनी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे. अर्जदार यांची तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असणे आवश्यक आहे. तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येण्याची आवश्यकता नाही. एका तक्रार अर्जात एकच तक्रार असावी, एकापेक्षा अनेक तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. तक्रारदाराने प्रथम पालिका स्तरावरील लोकशाही दिनामध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे, असे पालिकेमार्फत कळविले आहे.