बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करा ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करा !
बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करा !

बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करा !

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. ९ (बातमीदार) : नगरपरिषद हद्दीतील महिला बचत गटांना विनानिविदा काम देऊन त्यांच्यामार्फत कामे करून घेतल्यास महिलांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. त्यादृष्टीने पालिका प्रशासनाने कार्यवाही करावी असे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सूचित केले आहे.
अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील महिला बचत गटांचे सक्षमीकरण तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून बचत गटांकरीता राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत आमदार डॉ. किणीकर यांनी अंबरनाथ नगरपरिषदेत मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घेतला. बचत गटातील महिलांमध्ये सरकारच्या तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध योजना राबवून उन्नती साधण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे असल्याने याकरिता अंबरनाथ नगरपरिषदेच्या माध्यमातून शहर स्तरावरती बचत गटाकरिता आठवडाभर जनजागृती अभियान राबविणे, नगरपरिषदेबरोबरच शहर स्तरावरील फेडरेशनच्या माध्यमातून याकरिता पुढाकार घेण्यात यावा. बचत गटातील महिलांना समस्या उदभवू नये याकरिता ओळखपत्र उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही आमदार डॉ. किणीकर यांनी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांना दिल्या.
अंबरनाथ नगरपरिषद हद्दीअंतर्गत ७७२ बचत गट असून बचत गटांचे मिळून वस्ती स्तरावर २८ फेडरेशन व शहर स्तरावर एक फेडरेशन असल्याची माहिती अंबरनाथ नगरपरिषदेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व्यवस्थापक पौर्णिमा आव्हाड यांनी दिली.
माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, पुरुषोत्तम उगले, सुभाष साळुंखे, रवींद्र पाटील, प्रमोदकुमार चौबे, पालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके, महिला बचत गटांच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.