प्रीमियर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रीमियर
प्रीमियर

प्रीमियर

sakal_logo
By

प्रीमियर
१० नोव्हेंबरसाठी
................

प्रेक्षकांसाठी ‘रब से है दुआ’ नवी मालिका
लवकरच झी टीव्ही प्रेक्षकांसाठी ‘रब से है दुआ’ ही नवी मालिका घेऊन येत आहे. जुन्या दिल्लीतील परिसरात हैदरशी विवाह केलेल्या दुआ नावाच्या मुलीची कथा मालिकेत आहे. शुद्ध मनाची आणि साध्याभोळ्या स्वभावाची दुआ ही स्वत:ला अतिशय भाग्यवान समजते. तिचे वैवाहिक आयुष्य अतिशय सुखात आणि सुरळीत सुरू असते, पण तिच्या या समजुतीला एके दिवशी प्रचंड मोठा धक्का बसतो; जेव्हा हैदर दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडल्याचे सांगतो. दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याची परवानगी तो दुआकडे मागतो. तेव्हा दुआचे जीवन उद्ध्वस्त होते. या मालिकेत दुआची मध्यवर्ती भूमिका अभिनेत्री अदिती शर्मा साकारणार आहे. अदिती शर्मा म्हणाली, ‘‘मी तब्बल चार वर्षांनंतर छोट्या पडद्यावर भूमिका साकारत आहे. झी कुटुंबाचा पुन्हा एकदा भाग होण्याची संधी लाभत असल्याने मी खूपच आनंदात आहे. मालिकेतील माझी दुआची व्यक्तिरेखा ही एका सरळमार्गी आणि प्रेमळ मुलीची असून आपला पती हैदर याच्याबरोबर ती सुखाने जीवन कंठत असते, पण आपण दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलो आहोत आणि आपल्याला तिच्याशी लग्न करायचे आहे, असे जेव्हा हैदर तिला सांगतो, तेव्हा तिचे जग उद्ध्वस्त होते. मला या व्यक्तिरेखेचे गांभीर्य समजते. यानंतर तिच्या भावभावनांचा आलेख जसा चढत जाईल, तसतसा मला अनेक प्रकारच्या भावनांचा आविष्कार करायला लागणार आहे. एक अभिनेत्री म्हणून माझ्यापुढे हे सर्वांत मोठे आव्हान असेल.’’
..............

‘भेडिया’च्या अपना बना ले या गाण्याने चाहत्यांना केले मंत्रमुग्ध
अभिनेता वरुण धवनच्या ‘भेडिया’च्या नुकत्याच रिलिज झालेल्या ‘अपना बना ले’ या नवीन गाण्याने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. अरुणाचल प्रदेशच्या चित्तथरारक आणि आश्चर्यकारक दृष्यांसह मनमोहक असे हे रोमँटिक गाणे आहे. या गाण्याबद्दल बोलताना संगीतकार सचिन-जिगर म्हणतात, ‘‘अपना बना ले हे गाणे प्रेक्षकांना प्रेमात पाडणारे आहे. हे गाणे त्या अविस्मरणीय क्षणांचे वर्णन करते जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या एखाद्या खास व्यक्तीसाठी प्रेम जागृत होते. हा चित्रपट आणि त्यातील गाणी मोठ्या पडद्यावर पाहून प्रेक्षक नक्कीच भावूक होतील.’’
सर्व वयोगटांतील लोकांना आवडेल असे ‘अपना बना ले’ हे गाणे सचिन-जिगर यांनी संगीतबद्ध केले आहे. अरिजित सिंग आणि सचिन-जिगर यांच्या आवाजात आणि अमिताभ भट्टाचार्य यांच्या गीतांसह तयार केले आहे. अमर कौशिक दिग्दर्शित, दिनेश विजन निर्मित मॅडॉक फिल्म्स प्रॉडक्शनतर्फे, भेडिया हा चित्रपट २५ नोव्हेंबर २०२२ रोजी संपूर्ण भारतातील हिंदी, तेलुगू आणि तमिळ सिनेमांमध्ये २ डी आणि ३ डी मध्ये प्रदर्शित होणार आहे.

------

अभिषेक बॅनर्जीच्या अपूर्वाचे शूट पूर्ण...
बऱ्याच वेळा चित्रपटातील नायकासह खलनायकाच्या भूमिकादेखील लोकांच्या मनात घर करून राहतात. अशीच हिंदी चित्रपट ‘पाताळ लोक’ मधील त्यागीची भूमिका खूप गाजली ती केवळ हरहुन्नरी अभिनेता अभिषेक बॅनर्जीमुळे. यानंतर आता अभिषेकने निखिल नागेश भट दिग्दर्शित अपूर्वा चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले आहे. यात त्याच्यासह अभिनेत्री तारा सुतारिया, धैर्य करवा आणि राजपाल यादव हे मुख्य भूमिका साकारणार आहेत. याबद्दल अभिषेकने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घोषणा केली.
अभिनेता अभिषेक बॅनर्जीने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत त्याच्या आगामी अपूर्वा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची घोषणा केली. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, ‘‘नॉक नॉक इन्कमिंग रिस्क.’’ यासह त्याने स्वत: बंदुकीसह आणि टाळ्या वाजवतानाचे छायाचित्र शेअर केले. त्याशिवाय अभिषेक भेडिया, राणा नायडू, ड्रीम गर्ल २ मध्येदेखील दिसणार आहे आणि अलीकडेच तो ‘नजर अंदाज’मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता.