धोकादायक वळणावर टेम्पो रस्तासोडून अंगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धोकादायक वळणावर टेम्पो रस्तासोडून अंगणात
धोकादायक वळणावर टेम्पो रस्तासोडून अंगणात

धोकादायक वळणावर टेम्पो रस्तासोडून अंगणात

sakal_logo
By

कासा, ता. ९ (बातमीदार) : डहाणू नाशिक राज्य मार्गावर सूर्या नदी पुलापुढे वरोती गावाजवळ असलेल्या धोकादायक वळणावर मंगळवारी रात्री डहाणूहून सूर्यानगरकडे जाणाऱ्या टेम्पोचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट रस्ता सोडून जयेश सोळंकी यांच्या घराजवळील अंगणात सिमेंटच्या बाकड्याला ठोकला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोचालक भरधाव वेगाने असल्याने धोकादायक वळणावर सुटल्याने हा अपघात झाला. या भागात असलेल्या तीव्र वळण व बाजूस असलेल्या वडाच्या झाडामुळे येथे नेहमीच अपघात होत आहेत. चारच दिवसांपूर्वी रात्री रिक्षा वेगात जात असताना या वळणावर उलटली होती. त्यामुळे बांधकाम विभागाने येथे सूचना फलक किंवा गतिरोधक बसवण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.