अतिपर्जन्यामुळे वरई उत्पन्नात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिपर्जन्यामुळे वरई उत्पन्नात घट
अतिपर्जन्यामुळे वरई उत्पन्नात घट

अतिपर्जन्यामुळे वरई उत्पन्नात घट

sakal_logo
By

किन्हवली, ता. १० (बातमीदार) : आदिवासी डोंगराळ व पठारी पट्ट्यात भातपिकासोबत जोडपीक म्हणून घेतले जाणारे वरई पीक यंदा अतिपर्जन्यमानामुळे घटले आहे. त्‍यामुळे वरई विक्रीतून होणारा नफा अल्प प्रमाणात मिळणार असल्याने आदिवासी शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
शहापूर तालुका हा दुर्गम व डोंगराळ भागांनी व्यापला असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात पठारी व उताराचा भाग आहे. दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजासोबत शेतकरीवर्ग असून या भागात पारंपरिक पद्धतीने उतारावर नाचणी, वरई, तीळ, खुरसणी आदी पिकांची लागवड करण्यात येते. सपाट भूभागात भातशेती, तर उतारावरील माळरानात नाचणी व वरईची पिके घेण्यात येत आहेत.
खरिप हंगामात शहापुरात नाचणी, वरईचे पीक तीन हजार हेक्टरवर घेण्यात येते. भातापेक्षा वरईच्या विक्रीतून शेतकऱ्याला चांगला नफा मिळतो; पण यंदा अतिपर्जन्यमानामुळे लागवड उशिरा झाली. त्‍यातही लोंब्‍या काही प्रमाणात गळून पडल्याने यंदा वरईचे उत्पन्न घटले आहे.
--------------------------------------
वरईचे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असून शहरी भागात दरही चांगला मिळतो; मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे
उत्पन्न घटले, तर लागवडीसाठी झालेला खर्चही निघत नाही!
- लक्ष्मण गावंडा, फणसवाडी-टाकीपठार (शेतकरी)