कल्याण-डोंबिवलीत शुक्रवारी पाणीबाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण-डोंबिवलीत शुक्रवारी पाणीबाणी
कल्याण-डोंबिवलीत शुक्रवारी पाणीबाणी

कल्याण-डोंबिवलीत शुक्रवारी पाणीबाणी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्र व मोहिली उदंचन केंद्रास होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या फिडर दुरुस्तीचे काम महावितरणकडून करण्यात येणार आहे. या कामासाठी तसेच मोहने उदंचन केंद्र व बारावे जलशुद्धीकरण केंद्रावरील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. शुक्रवारी ११ नोव्हेंबरला हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे बारावे, मोहिली व नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद राहणार आहे.