आजपासून पद्मश्री अण्णासाहेब जाधव स्मृती व्याख्यानमाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजपासून पद्मश्री अण्णासाहेब जाधव स्मृती व्याख्यानमाला
आजपासून पद्मश्री अण्णासाहेब जाधव स्मृती व्याख्यानमाला

आजपासून पद्मश्री अण्णासाहेब जाधव स्मृती व्याख्यानमाला

sakal_logo
By

भिवंडी, ता. ९ (बातमीदार) : पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी भिवंडी येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. या वर्षी ही व्याख्यानमाला १० ते १२ नोव्हेंबर या दिवशी पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय भिवंडी येथे पार पडणार आहे. व्याख्यानमालेचे उद्‌घाटन संस्थाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते होणार असून पहिले पुष्प ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार उत्तम कांबळे हे गुंफणार आहेत. ‘शिक्षण... कुठून कुणीकडे?’ या विषयावर ते बोलणार आहेत. दुसऱ्या दिवशी ‘भयंकर सुंदर मराठी भाषा...!’ या विषयावर प्रा. अशोक बागवे आपले विचार मांडणार आहेत. तिसऱ्या दिवशी समारोप सत्रावेळी दिव्यांग कलाकारांचा आनंदयात्री हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे.
या व्याख्यानमालेला रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानमालेतील मौलिक विचारांचा लाभ घेण्याचे आवाहन विजय जाधव यांनी संयोजन समितीच्या वतीने केले आहे. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेकरिता सुधीर घागस, ज्ञानेश्वर गोसावी, दिनकर नाईक, विजय मोरे, जगदीश पाटील, प्रशांत घागस, राहुल पाटील, शैलेंद्र सोनवणे हे परिश्रम घेत आहेत.