बेवारस वाहने, बॅनर्सवर केडीएमसची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेवारस वाहने, बॅनर्सवर केडीएमसची कारवाई
बेवारस वाहने, बॅनर्सवर केडीएमसची कारवाई

बेवारस वाहने, बॅनर्सवर केडीएमसची कारवाई

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : शहर विद्रूप करणारे बॅनर्स, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बेवारस वाहनांवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली आहे. ७ वाहने; तर २०० हून अधिक लहान मोठ्या बॅनर्सवर पालिकाच्या प्रशासनाने कारवाई केली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रातील बेवारस वाहने व बॅनर्स यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. फ प्रभागातील प्रभाग अधिकारी दिनेश वाघचौरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी डोंबिवली पूर्वेतील व्ही. पी. रोड, कल्याण रोड व नेहरू मैदान परिसरातील सहा दुचाकी व एक तीनचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. ही वाहने खंबाळपाडा येथील वाहनतळावर जमा करण्यात आली आहेत. तसेच आग्रा रोड, बैलबाजार, कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसर, पूर्वेतील पुणा लिंक रोड, विठ्ठलवाडी १०० फुटी रोड, शास्त्रीनगर, गुप्ते रोड, कोपर रोड, महात्मा फुले रोड येथील सुमारे २४० बॅनर्सवर पालिका प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.