छबिलदास शाळेचे वर्ग ऑनलाईन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छबिलदास शाळेचे वर्ग ऑनलाईन
छबिलदास शाळेचे वर्ग ऑनलाईन

छबिलदास शाळेचे वर्ग ऑनलाईन

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. ९ (बातमीदार) : दादर पश्चिम येथील छबिलदास शाळेच्‍या कॅटीनमध्ये गेल्या आठवड्यात सिलिंडर स्फोट झाल्यानंतर धोकदायक भाग तोडण्याचे काम अद्याप सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळांचे वर्ग ऑनलाईन चालू राहणार असल्‍याचे शाळेचे अध्यक्ष शैलेंद्र साळवी यांनी सांगितले.
दादरसारख्या गजबजलेल्या परिसरात दोन माजली छबिलदास शाळेची इमारत आहे. गेल्या आठवड्यात शाळेच्या कॅटीनमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला होता. त्‍यामध्‍ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील भाग कोसळला तर एका भिंतीला तडे गेले. त्यामुळे पालिकेच्या आदेशानुसार धोकादायक भाग पाडण्याचे काम सुरू आहे. आजूबाजूला वस्ती व दुकाने आहेत. त्याचप्रमाणे रहदरीचा भाग असल्याने काम काळजी घेऊन करावे लागत असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर त्याचा अहवाल पालिकेकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता संपूर्ण इमारतीला स्कॅफोल्डिंग करण्यात येणार असून सधारण १० दिवसांत शाळा ऑफलाईन होईल, असे साळवी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन वर्ग घेण्यात येत असल्‍याचेही त्‍यांनी या वेळी सांगितले.