कुणबी समाजाच्‍यावतीने पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुणबी समाजाच्‍यावतीने पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिर
कुणबी समाजाच्‍यावतीने पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिर

कुणबी समाजाच्‍यावतीने पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिर

sakal_logo
By

घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः कुणबी समाजोन्नती संघाच्‍या मुंबई विभागीय शाखा विक्रोळी-घाटकोपर आणि संलग्न कुणबी युवा यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराचे रविवारी (ता. १३) आयोजन केले आहे. सकाळी दहा वाजता विक्रोळी पश्चिम येथील गुरुकुल हॉल, रोड नंबर सहा पार्कसाईट येथे हे शिबिर पार पडणार आहे. या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी सहायक पोलिस आयुक्‍त रोहिदास दुसार व रमेश घडवले उपस्थित राहाणार आहेत. तसेच मध्यवर्ती कुणबी युवा मंडळ शाखेचे अध्यक्ष माधव कांबळे, पदाधिकारी, महिला कार्यकारिणी, युवक कार्यकारिणी आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.