पालघर काँग्रेस कमिटीतर्फे नोटाबंदीवरून निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर काँग्रेस कमिटीतर्फे नोटाबंदीवरून निदर्शने
पालघर काँग्रेस कमिटीतर्फे नोटाबंदीवरून निदर्शने

पालघर काँग्रेस कमिटीतर्फे नोटाबंदीवरून निदर्शने

sakal_logo
By

पालघर, ता. ९ (बातमीदार) : मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयला सहा वर्षे पूर्ण झाली असून देशाची आर्थिक परिस्थिती कोलमडली असल्याचा आरोप करत पालघर काँग्रेस कमिटीने काळा दिवस पाळत भाजप सरकारच्या विरोधात हुतात्मा चौकात आंदोलन केले. या वेळी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, तालुका अध्यक्ष राजेश अधिकारी, दिलीप पाटील वाडा, घनश्याम आळशी विक्रमगड, पालघर शहराध्यक्ष मनोहर दांडेकर, जिल्हा सेक्रेटरी निराला, डहाणू तालुका अध्यक्ष संतोष मोरे, मधुकर चौधरी, सुरेंद्र शेट्टी, वासू लाला पाटील, उमेश कैलास, पंढरी घरत, पालघर शहर सचिव विश्वनाथ राऊत, राजेंद्र गोवारी, रज्जन मिश्रा, राजेश्वर भटनागर, रिजवान खान, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.