टोईंग व्हॅनद्वारे तीन दिवसांत ६७ दुचाकींवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोईंग व्हॅनद्वारे तीन दिवसांत ६७ दुचाकींवर कारवाई
टोईंग व्हॅनद्वारे तीन दिवसांत ६७ दुचाकींवर कारवाई

टोईंग व्हॅनद्वारे तीन दिवसांत ६७ दुचाकींवर कारवाई

sakal_logo
By

ठाणे, ता. ९ (वार्ताहर) : कोरोना महामारीनंतर ठाणे वाहतूक शाखेने पुन्हा टोईंग व्हॅन सुरू करीत अनधिकृत पार्किंगवर कारवाई सुरू केली आहे. तत्पूर्वी चार दिवस नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मेगाफोनद्वारे आवाहन केले. शनिवारपासून ते मंगळवार या तीन दिवसांत वाहतूक विभागाने ६७ दुचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत १९ हजार ५०० रुपयांची वसुली केल्याची माहिती वाहतूक पोलिस सूत्रांनी दिली.
नो पार्किंगमध्ये वाहन पार्किंग केल्यास दुचाकीला ५०० रुपये दंड आणि २०० रुपये टोईंग पावती अशी दंडाची तरतूद वाहतूक पोलिसांनी केली. शनिवारी ५ नोव्हेंबर रोजी टोईंग व्हॅन ठाणे शहरात फिरल्या आणि पहिल्याच दिवशी २२ दुचाकीवर कारवाई करण्यात आली. दंडात्मक कारवाई पोलिसांनी सात हजारांची वसुलीही केली. अन्य वाहनचालकांची चलन फाडण्याच्या कारवाई करण्यात आली. रविवारी टोईंग बंद ठेवण्यात आलेल्या होत्या; तर सोमवारी या व्हॅनने नो पार्किंगमध्ये पार्क केलेल्या ३५ जणांवर कारवाई केली, यापैकी २५ जणांनी १२ हजार ५०० रुपयांचा दंड जमा केला; तर मंगळवारीही १० दुचाकींवर कारवाई करण्यात आली. सोमवारी गुरुनानक जयंतीमुळे वाहनांना पार्किंगसाठी जागाच नसल्याने टोईंग व्हॅनने कारवाई शिथिल करत गुरुद्वारा परिसराच्या आसपासच्या २५ दुचाकींना अभय दिले; तर या वेळी केवळ १० दुचाकीच्या पावत्या फाडण्यात आल्याची माहिती वाहतूक टोईंग व्हॅनचे अंमलदार यांनी दिली.