प्रक्षेकाला मारहाण प्रकरण; आमदार आव्हाडांसह पदाधिकाऱ्यांना नोटीसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रक्षेकाला मारहाण प्रकरण; आमदार आव्हाडांसह पदाधिकाऱ्यांना नोटीसा
प्रक्षेकाला मारहाण प्रकरण; आमदार आव्हाडांसह पदाधिकाऱ्यांना नोटीसा

प्रक्षेकाला मारहाण प्रकरण; आमदार आव्हाडांसह पदाधिकाऱ्यांना नोटीसा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमधील चित्रगृहात प्रवेश करत ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला. याचदरम्यान प्रेक्षक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह १०० पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ठाणे शहर पोलिसांनी आव्हाड यांच्यासह त्यांच्यासोबत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार आव्हाड यांनी सोमवारी रात्री १० वाजता विवियाना मॉल येथे आंदोलन करत प्रेक्षकांना बाहेर काढून हा शो बंद पाडला. या वेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एका प्रेक्षकाला धक्काबुक्की करीत मारहाण केली. या वेळी इतिहासाची मोडतोड करून हा चित्रपट दाखवला जात असल्याचा आरोप या वेळी आव्हाड यांनी केला होता. मारहाणप्रकरणी दिलेल्या तक्रारीनंतर आव्हाड यांच्यासह १०० पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाचा तपास सुरू असताना, पोलिसांनी आव्हाड यांच्यासह सर्वांनाच तपासात सहकार्य करण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत.

-----
वर्तकनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात सर्वांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच वेळोवेळी त्या सर्वांना बोलावण्यात येईल आणि तपासाच्या अनुषंगाने त्यांची चौकशी केली जाईल.
- डॉ विनय कुमार राठोड, पोलिस उपायुक्त, ठाणे.