महावितरणच्या विजेच्या पेटीचा दरवाजा चोरीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरणच्या विजेच्या पेटीचा दरवाजा चोरीला
महावितरणच्या विजेच्या पेटीचा दरवाजा चोरीला

महावितरणच्या विजेच्या पेटीचा दरवाजा चोरीला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. ९ : कल्याण-डोंबिवली शहरात भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले आहे. या चोरांना कोणाचाही धाक राहिला नसल्याचा प्रकार एका व्हिडीओमधून दिसत आहे. रस्त्यावरील महावितरणच्या विजेच्या पेटीचा दरवाजाच काढून चोरून नेल्याची घटना डोंबिवली पश्चिमेत घडली. एका नागरिकाने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात ही घटना कैद केली आहे. विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरच ही चोरीची घटना दिवसाढवळ्या घडली असून पोलिसांचा वचक चोरांवर राहिला नसल्याचे यातून दिसून येते.

डोंबिवली पश्चिमेतील रिद्धी-सिद्धी इमारती समोर असलेल्या महावितरणच्या एका विजेच्या पेटीचा लोखंडी दरवाजा एका महिलेने काढून घेते, त्यानंतर तेथे एक रिक्षाचालक येतो, यांनी ही महिला रिक्षात बसून निघून जाते. ही चोरीची घटना एका नागरिकाने मोबाईलच्या कॅमेऱ्याच चित्रित केली असून सध्या हा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. याविरोधात आता पोलिस काय कारवाई करतात, हे पहावे लागेल. तसेच महावितरणचा विजेची पेटी उघडी पडल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांसह महावितरणदेखील याकडे कसे लक्ष देते, हे पाहावे लागेल.