इमारतीची सौरउर्जेची यंत्रणा चोरीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इमारतीची सौरउर्जेची यंत्रणा चोरीला
इमारतीची सौरउर्जेची यंत्रणा चोरीला

इमारतीची सौरउर्जेची यंत्रणा चोरीला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ९ : धर्मवीर नगरमध्ये १२ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या ३६ इमारतींपैकी एका इमारतीच्या गच्चीवरून सौरऊर्जेची यंत्रणा चोरीला गेल्याची बाब समोर आली आहे. पालिकेने सदनिकांचा ताबा दिल्यानंतर या इमारतीमधील रहिवाशांनी समिती गठित केली, असून यामुळे पालिका या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. तसेच उपनिबंधक कार्यालयात सोसायटी नोंदणीकृत नसल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालिका आणि पोलिस यंत्रणेकडून टाळाटाळ होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या प्रकरणी रहिवाशांकडून पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.
ठाण्यातील धर्मवीर नगर येथाल बीएसयूपी योजनेतील १५ क्रमांकाच्या इमारतीत गेल्या १२ वर्षांपासून नागरिक वास्तव्य करीत आहेत. या इमारतींवर महापालिकेने सौरउर्जा यंत्रणा बसवली होती. पालिकेने सदनिकेचा ताबा दिल्यानंतर या इमारतीमधील रहिवाशांनी समिती गठित केली. या इमारतीमधील सौरयंत्रणा चोरीस गेली असून या यंत्रणेचा सर्व सदनिकाधारकांना फायदा होत होता. या यंत्रणेबाबत जुन्या समितीकडे विचारणा करूनही त्यांच्याकडून उत्तरे मिळत नव्हती. रहिवाशांनी काही महिन्यांपूर्वी ही जुनी समिती बदलून नवी समिती गठित केली आहे. पालिकेने सदनिकेचा ताबा दिल्यानंतर या इमारतीमधील रहिवाशांनी समिती गठित केली असून यामुळे पालिका या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्याचबरोबर रहिवाशांची समिती नेमण्यात आली असली, तरी उपनिबंधक कार्यालयात सोसायटी नोंदणीकृत करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसही तक्रारी घेत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.