पश्चिम रेल्वेची रखडपट्टी सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम रेल्वेची रखडपट्टी सुरूच
पश्चिम रेल्वेची रखडपट्टी सुरूच

पश्चिम रेल्वेची रखडपट्टी सुरूच

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकात आज (ता. ७) सकाळी ८.३६ वाजण्याच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. या बिघाडामुळे लोकल फेऱ्या उशिराने धावत होत्या. गेल्या पाच दिवसांत तिसऱ्यांदा सिग्नल बिघाडाची घटना घडल्याने पश्चिम रेल्वेची रखडपट्टी सुरू असल्याचे दिसत आहे. परिणामी प्रवाशांचे दररोज हाल होत आहे.
अंधेरी स्थानकांवर बुधवारी सकाळी ८.३६ वाजता अप-जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे लोकलचे तीन-तेरा वाजले. त्यामुळे या मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे दोन्ही मार्गावरील लोकलचे वेळापत्रक विस्कळित झाले. सकाळी ९ वाजून १२ मिनिटांनंतर सिग्नल यंत्रणा दुरुस्त करून लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली; मात्र दुपारी एक वाजेपर्यंत मार्गावरील लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धाव होत्या.
----
सातत्याने बिघाड
- ४ नोव्हेंबर २०२२ ः गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड (दीड तास खोळंबा)
- ७ नोव्हेंबर २०२२ ः वैतरणा ते विरार स्थानकादरम्यान सकाळी सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड (दोन तास खोळंबा)
- ९ नोव्हेंबर २०२२ ः अंधेरी स्थानकात सकाळी सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड (एक तास खोळंबा)
---
प्रतिक्रिया-
गेल्या पाच दिवसांपासून पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेत सतत तांत्रिक बिघाड होत आहे. परिणामी सकाळीच प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे दर रविवारी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकदरम्यान रेल्वे कर्मचारी काय काम करतात, त्या कामाचे ऑडिट करण्यात यावे.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ