सफाळे रेल्वे स्थानकात आता सरकता जिना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सफाळे रेल्वे स्थानकात आता सरकता जिना
सफाळे रेल्वे स्थानकात आता सरकता जिना

सफाळे रेल्वे स्थानकात आता सरकता जिना

sakal_logo
By

पालघर, ता. ९ (बातमीदार) : सफाळे रेल्वे स्थानकात आता सरकत्या जिन्याची सुविधा येत्या महिनाभरात उपलब्ध होणार असून, यामुळे या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार डहाणू दरम्यानचे सफाळा रेल्वे स्थानक अलीकडे गजबजू लागले आहे. सफाळा व परिसरातील सुमारे ७० गावातील प्रवासी नोकरी-धंद्यानिमित्त एका बाजूने मुंबई तर दुसऱ्या बाजूने पालघर, बोईसर, डहाणू व गुजरातकडे प्रवास करत असतात. या भागातील प्रवाशांची वाढती संख्या तसेच गैरसोय लक्षात घेऊन रेल्वेने येथे सरकता जिना उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सरकत्‍या जिन्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच हा जिना प्रवाशांना वापरण्यासाठी खुला होणार असल्याची माहिती सफाळा रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक चुनीलाल अगले यांनी दिली