कल्याणमध्ये संजय राऊत यांच्या सुटकेचा आनंदोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्ये संजय राऊत यांच्या सुटकेचा आनंदोत्सव
कल्याणमध्ये संजय राऊत यांच्या सुटकेचा आनंदोत्सव

कल्याणमध्ये संजय राऊत यांच्या सुटकेचा आनंदोत्सव

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : संजय राऊत यांना जामीन मंजूर होताच कल्याणमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडत, एकमेकांना पेढे भरवत जल्लोष करण्यात आला. या वेळी उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जल्लोषात सामील झाले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांची जामीनावर सुटका होऊन ते बाहेर येताच कल्याण जिल्हाप्रमुख सचिन बासरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. कोणत्याही दडपणाला न घाबरता पक्षासाठी लढणारे, शिवसेनेचे फायर ब्रँड नेते, शिवसेनेचा ढाण्या वाघ, शिवसेनेची तोफ अशा प्रकारच्या घोषणा या वेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. पत्रा चाळप्रकरणी शंभर दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर होऊन ते बाहेर आल्यानंतर शिवसैनिकांनी हा आनंदोत्सव साजरा केला.