डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय बँकेची निर्मिती करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय बँकेची निर्मिती करणार
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय बँकेची निर्मिती करणार

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय बँकेची निर्मिती करणार

sakal_logo
By

खर्डी, ता. १० (बातमीदार) : १ एप्रिल २०२३ ला डॉ. बी. आर. आंबेडकर को. क्रेडिट बँक सुरू होणार असून आंतरराष्ट्रीय बँकेची निर्मिती करणार असल्याचे बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी शहापूर येथे आयोजित केलेल्या भागधारक मेळाव्यात जाहीर केले. बौध्दांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी बुध्दिस्ट बँक निर्माण करण्यात आली असून १५ डिसेंबर २०२२ पर्यंत भागधारकांनी नोंदणी करावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने ठाणे जिल्ह्याच्या बँकेच्या भागधारकांचा परिचय मेळावा शहापूर तालुक्याच्या वतीने रविवारी आगरी समाज सभागृहात ठाणे जिल्हाध्यक्ष बुधाजी वाढविंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.