वक्तृत्व स्पर्धांतून शब्दांशी नाते दृढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वक्तृत्व स्पर्धांतून शब्दांशी नाते दृढ
वक्तृत्व स्पर्धांतून शब्दांशी नाते दृढ

वक्तृत्व स्पर्धांतून शब्दांशी नाते दृढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : आताच्या तरुण पिढीचे शब्दांशी नाते तुटत आहे. यासाठी दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या नावाने होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून पुन्हा शब्दांशी नाते जोडले जाईल, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या जयंतीनिमित्ताने समन्वय प्रतिष्ठानतर्फे ठाण्यातील के. बी. पी. महाविद्यालयात भरविलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा मंगळवारी समारोप झाला. वक्तृत्व स्पर्धेत वरिष्ठ गटात पराग बद्रिके व कनिष्ठ गटात अनन्या म्हात्रे यांनी प्रथम क्रमांक पटकावून प्रत्येकी दहा हजार रुपयाचे बक्षीस जिंकले. आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक आणि प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेत वरिष्ठ गटात यश पाटील याने द्वितीय, श्रुती बोरस्तेने तृतीय आणि विवेक वारभुवन याने उत्तेजनार्थ बक्षीस जिंकले; तर कनिष्ठ गटात द्वितीय क्रमांकावर रागिणी भोसले, तृतीय क्रमांकावर प्रियांका दळवी आणि उत्तेजनार्थ म्हणून मनस्वी माने यांना बक्षीस देण्यात आले.
उत्तम वक्तृत्वासाठी सातत्याने नवनवीन लोकांबरोबर बोलत राहिले पाहिजे. बोलण्याबरोबरच दुप्पट वाचले पाहिजे; तर पाच ते सहापट ऐकले पाहिजे. वक्तृत्वासाठी आत्मविश्वासही महत्त्वाचा असून, शब्दांची मांडणीही योग्य पद्धतीने करावी, अशी सुचना उपाध्ये यांनी तरुणांना केली. प्रत्येक भाषणाच्या वेळी आपल्यासमोर जनसमुदाय कोणत्या पद्धतीचा आहे ते ध्यानात घेण्याबरोबरच सखोल अभ्यास करून भाषण करावे. अशा पद्धतीने तुम्हाला वक्तृत्वात यश मिळेल, असे उपाध्ये यांनी सांगितले.