गरोदर मातेला युवकाकडून रक्‍तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गरोदर मातेला युवकाकडून रक्‍तदान
गरोदर मातेला युवकाकडून रक्‍तदान

गरोदर मातेला युवकाकडून रक्‍तदान

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १० (बातमीदार) ः असल्फा येथील युवकाने गरोदर मातेला योग्‍य वेळी रक्‍तदान करत माणुसकीचे दर्शन घडवले आहे. संगीता राणे या महिला डोंबिवलीत राहतात. त्या प्रसूतीसाठी मंगळवारी डोंबिवलीतील रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्‍यांना ए निगेटिव्ह रक्तगटाची आवश्यकता होती; मात्र ते मिळत नव्‍हते. त्यांच्या नातेवाइकांनी घाटकोपर येथील समर्पण रक्तपेढीशी संपर्क साधला; मात्र तिथेही रक्तगट उपलब्ध नव्‍हता. त्‍या वेळी या रक्तपेढीत सातत्याने रक्तदान करणारे आणि ए निगेटिव्ह रक्तगट असलेले राहुल बर्वे यांना संपर्क साधून रक्तदान करण्यासाठी आवाहन केले. यावेळी राहुल यांनी क्षणाचाही विलंब न लावता रक्तदान केले. यामुळे गरोदर महिलेला दिलासा मिळाला. प्रत्येक युवकाने रक्तदान केले पाहिजे, असे आवाहन राहुल बर्वे यांनी केले आहे.