श्लोक अध्ययन शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्लोक अध्ययन शिबिर
श्लोक अध्ययन शिबिर

श्लोक अध्ययन शिबिर

sakal_logo
By

मुलुंड, ता. १० (बातमीदार) ः लहान मुलांपासून तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना एकत्र घेऊन प्रज्ञा पंडित यांनी श्लोक पठण विद्यालयाची स्थापना केली आहे. संस्कृती आणि संस्कार जपण्यासाठी त्यांनी सामाजिक भावनेतून श्लोक मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केलेले आहे. या शिबिरासाठी अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, मॉरिशस, इत्यादी अनेक ठिकाणांहून ऑनलाईन पद्धतीने अनेक जण सहभागी होत आहेत. ‘प्रज्ञा श्लोक पठण’ वर्गाद्वारे संस्कृत श्लोक पठण व अध्ययन वर्ग घेण्यात येतात. शनिवारी (ता. १२) संध्याकाळी सहा ते सात वाजता विनामूल्य मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहे. ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या या शिबिरास प्रवेश घेण्यासाठी ९३२०४४१११६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.