‘आदर्श संस्थाचालक’ने वागेश कदम यांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आदर्श संस्थाचालक’ने वागेश कदम यांचा सन्मान
‘आदर्श संस्थाचालक’ने वागेश कदम यांचा सन्मान

‘आदर्श संस्थाचालक’ने वागेश कदम यांचा सन्मान

sakal_logo
By

पालघर, ता. १० (बातमीदार) : जीवन विकास शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष वागेश कदम यांना मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते ‘वसंत स्मृती आदर्श शिक्षण संस्थाचालक’ पुरस्काराने गौरविण्यात आले. जीवन विकास शिक्षण संस्था पालघर ही जिल्ह्यातील दलित, आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोचवण्याचे कार्य ५० वर्षांहून अधिक काळापासून करीत आहे. सध्या संस्थेच्या तीन माध्यमिक विद्यालय, दोन प्राथमिक विद्यालय, दोन आश्रमशाळा, दान इंग्रजी माध्यम विद्यालय, दोन कनिष्ठ महाविद्यालये आणि एक सीबीएसई स्कूल सुरू आहेत; तर कदम यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
....
पालघर : शिक्षण संस्थाचालक वागेश कदम यांना रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गौरवण्यात आले.