घोळ येथे भात खरेदी प्रक्रिया सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोळ येथे भात खरेदी प्रक्रिया सुरू
घोळ येथे भात खरेदी प्रक्रिया सुरू

घोळ येथे भात खरेदी प्रक्रिया सुरू

sakal_logo
By

कासा, ता. १० (बातमीदार) : जिल्ह्यात भातकापणीच्या कामाला वेग आला असून महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकार यांच्या आधारभूत भात खरेदी केंद्राचे उद्‌घाटन घोळ येथे झाले आहे. भात खरेदी केंद्रावर आजुबाजूच्या अनेक खेड्या-पाड्यांतील शेतकरी येत आहेत; पण या वर्षी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे अजूनही भातकापणी सुरूच आहे. अनेकांची भातझोडणी बाकी आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर अजूनही उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत नाही. यामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे. ३० नोहेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी कागदपत्र देऊन नोंदणी करावी, असे आवाहन कासा खरेदी केंद्राचे उपप्रादेशिक व्यवस्थापक नितीन भुरे यांनी केले आहे. यावर्षी महामंडळाकडून प्रतिक्विंटल भाताला २०४० एवढा भाव दिला जाणार आहे. तसेच व्यापाऱ्यांकडून फसवणूक होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांनी महामंडळाच्या खरेदी केंद्रांवरच आपले धान्यविक्री करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.