पर्यटन व्यवसायात कोळी बांधवना प्राधान्य द्यावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटन व्यवसायात कोळी बांधवना प्राधान्य द्यावे
पर्यटन व्यवसायात कोळी बांधवना प्राधान्य द्यावे

पर्यटन व्यवसायात कोळी बांधवना प्राधान्य द्यावे

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. १० (बातमीदार) : मुंबईतील कोळीवाडे पर्यटनाचे केंद्रबिंदू व्हावेत, यासाठी त्यांचे सुशोभीकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्‍यान येथील पर्यटन विकसित करताना कोळी समाजाला प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमनने केली आहे.
कोळीवाडे पर्यटनदृष्ट्या विकसित झाल्यानंतर त्यावर कोळी समाजाची एक समिती नेमावी, तसेच स्थानिक कोळी भूमिपुत्रांना यातून रोजगाराची संधी प्राप्त करून द्यावी, असे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार असल्याचे नॅफचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. पर्यटनातील लहान-मोठे उद्योग धंदे, बोटिंग, कँटिन ठेकेदार यांसारखे रोजगार जन्मजात कोळी बांधवना देण्यात यावेत, अशी मागणी पत्रकातून करण्यात आली आहे.
कोकणात ज्याप्रमाणे पर्यटन विकसित करण्यात आले, त्याचप्रमाणे मुंबईतदेखील अधिक चांगले पर्यटन विकसित होऊ शकेल, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश चांगले असून यातून अनेक रोजगारदेखील उपलब्ध होतील, यासाठी नॅफने त्यांचे आभार मानले आहेत.