शिवसैनिक राऊत यांच्या भेटीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसैनिक राऊत यांच्या भेटीला
शिवसैनिक राऊत यांच्या भेटीला

शिवसैनिक राऊत यांच्या भेटीला

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १० (बातमीदार) ः शिवसेनेची तोफ समजल्या जाणाऱ्या खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर होताच बुधवारी राज्यभर शिवसैनिकांनी फटाके वाजवत, गुलाल उधळत जल्लोष साजरा केला; तर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. राज्यभरातून शिवसैनिक राऊत यांच्या भेटीसाठी जात आहेत. शिवसेना ईशान्य मुंबईचे विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे निवासस्थानी स्वागत करण्यात आले. या वेळी माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी, संजय दरेकर, सुनील मोरे, प्रदीप माडवकर, संजय शेट्टी व पदाधिकारी उपस्थित होते.