रिक्षाचालकांनी श्रमदानातून बुजवला खड्डा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षाचालकांनी श्रमदानातून बुजवला खड्डा
रिक्षाचालकांनी श्रमदानातून बुजवला खड्डा

रिक्षाचालकांनी श्रमदानातून बुजवला खड्डा

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १० (बातमीदार) : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांबरोबरच रिक्षाचालकांनादेखील त्रासाला सामोरे जावे लागते. पालिकेला वारंवार सांगूनही जोडरस्त्यावरील खड्डा बुजवण्यात आला नसल्याने अखेर रिक्षाचालकांनीच श्रमदानाद्वारे पडलेला खड्डा बुजवून प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घातले आहे.
एमएमआरडीएमार्फत कल्याण-बदलापूर महामार्ग सिमेंट-काँक्रीटचा करण्यात आला आहे. अद्याप सीसी रोडवर खोदकाम होत असल्याने, काही जागी पेव्हर ब्लॉक उखडले असून, रस्त्यावर खड्डे पडले आहेत. याच महामार्गावरून डीएमसी कंपनीकडून रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्तादेखील सिमेंटचा करण्यात आला आहे; मात्र भूमिगत वाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदल्याने पडलेला खड्डा बुजवण्यास प्रशासनाला वेळ मिळत नसल्याने अखेर आज गुरुवारी श्रीकांत मंडोलीकर, राकेश चिमणगे आणि नीतेश या रिक्षाचालकांनी काही वेळ रिक्षा रस्त्याच्या बाजूला उभ्या केल्या आणि श्रमदानाद्वारे रस्त्याच्या बाजूला पडलेली माती टाकून खड्डा बुजवला.