सुरेश देशपांडे यांचा उद्या कथाकथन कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरेश देशपांडे यांचा उद्या कथाकथन कार्यक्रम
सुरेश देशपांडे यांचा उद्या कथाकथन कार्यक्रम

सुरेश देशपांडे यांचा उद्या कथाकथन कार्यक्रम

sakal_logo
By

ठाणे, ता. १० (बातमीदार) : लेखक सुरेश देशपांडे यांच्या पुस्तकांच्या कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे ठाण्यात शनिवारी (ता. १२) सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद कार्यालयासमोरील वा. अ. रेगे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. सुरेश देशपांडे हे आरती प्रकाशनाचे प्रकाशक व मालक आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे येथील कार्यकारिणीचे ते कार्यकारिणी सदस्य आहेत. विविध नियतकालिके आणि वृत्तपत्रे यात नियमित लेखन केलेले असून त्यांची कथा व कादंबरीची पुस्तके प्रसिद्ध आहेत. हा कार्यक्रम त्यांच्या स्वतःच्या कथाकथनावर आधारित असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदचे ठाणे जिल्हा कार्यवाह चांगदेव काळे यांनी दिली.