खोडाळ्यातला परिवहनच्या निषेधार्थ रास्तारोको टळणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोडाळ्यातला परिवहनच्या निषेधार्थ रास्तारोको टळणार?
खोडाळ्यातला परिवहनच्या निषेधार्थ रास्तारोको टळणार?

खोडाळ्यातला परिवहनच्या निषेधार्थ रास्तारोको टळणार?

sakal_logo
By

मोखाडा, ता. १० (बातमीदार) : वाडा-खोडाळा मार्गावर ओगदा गावाजवळ रस्ता नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे तब्बल महिन्यांपासून या मार्गावरून एक ही बससेवा धावलेली नाही. बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रवासी हितवर्धक संघाने १४ नोव्हेंबरला खोडाळा चौफुलीवर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खडबडून जागे झाले आणि सदरचा रस्ता दुरुस्त झाला आहे. वळणरस्ताही वापरात असल्याचे वाडा आगार व्यवस्थापक व प्रवासी संघाला लेखी कळवले आहे. त्यामुळे रास्ता रोको आंदोलन टळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बांधकाम विभागाने रस्ता वाहतुकीस सुरळीत असल्याचे पत्र दिले आहे; मात्र वाडा आणि पालघर या दोन्ही आगारांच्या पूर्वापार सुरू असलेल्या बससेवा पूर्ववत सुरू न झाल्यास हाच रास्ता रोको परिवहन सेवेच्या निषेधार्थ अधिक तीव्रपणे करण्याचा इशारा प्रवासी हितवर्धक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मुळे यांनी दिला आहे.