दागिने चोरणाऱ्या गुन्हेगारास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दागिने चोरणाऱ्या गुन्हेगारास अटक
दागिने चोरणाऱ्या गुन्हेगारास अटक

दागिने चोरणाऱ्या गुन्हेगारास अटक

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. १० (बातमीदार) : महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका चोरट्यास भिवंडी नारपोली पोलिसांनी कल्याणमधून अटक केली आहे. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणून एक लाख दोन हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. वसई मार्गावरून भिवंडी अंजूरफाटा येथे येणाऱ्या समीक्षा सुनील पाटील या महिलेच्या गळ्यातून चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र, चेन खेचून नेली होती. या बाबतीत नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पलिसांनी तपास सुरू केला असता मिळालेल्या माहितीवरून कल्याण-आंबिवली येथून बाबर अली (वय ३९) यास अटक केली. त्याच्याकडून ५४ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हस्तगत केली. अधिक चौकशी केली असता त्याने अन्य ठिकाणीसुद्धा सोन्याचे गंठण चोरल्याचे कबूल केले. त्यामुळे ४८ हजार ६०० रुपये किमतीचे गंठणसुद्धा पोलिसांनी जप्त केले असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त किशोर खैरनार यांनी दिली. सदर आरोपीवर महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ४० गुन्हे नोंद असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बल्लाळ करीत आहेत.