अस्वच्छतेबद्द दोघांवर दंडात्मक कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अस्वच्छतेबद्द दोघांवर दंडात्मक कारवाई
अस्वच्छतेबद्द दोघांवर दंडात्मक कारवाई

अस्वच्छतेबद्द दोघांवर दंडात्मक कारवाई

sakal_logo
By

ठाणे, ता. १० : ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर हे ॲपलॅब कंपनीच्या चौकात पाहणी करत असताना एका रिक्षाचालकाने चित्रांनी सुशोभित केलेल्या भिंतींवर मूत्रविसर्जन केल्याचे निदर्शनास आले. त्या व्यक्तीला जागेवरच दंड करण्याचे निर्देश आयुक्तांनी उपायुक्त शंकर पाटोळे यांना दिले. तिथे असलेल्या स्वच्छता निरीक्षकाने दंडाची कारवाई केली. पाठोपाठ, वागळे इस्टेट येथे नाल्याची पाहणी सुरू असतानाच तिथेच रस्त्याच्या बाजूला मूत्रविसर्जन करणाऱ्या अन्य एकालाही दंड करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. शहर सुशोभीकरण, स्वच्छता मोहीम यातून शहरातील स्वच्छतेचे भान वाढवण्याचा पालिका आटोकाट प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नांना अशा बेशिस्त वर्तनामुळे तडा जातो. त्यामुळे कारवाईची अप्रिय भूमिका घ्यावी लागते, असे या घटनांबद्दल आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले. नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकताना, लघुशंका करताना, थुंकताना आपल्या शहराचा विचार करावा आणि अशा बेशिस्त वर्तनापासून दूर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.