मध्य रेल्वेकडून १२३६ मुलांची घरवापसी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेकडून १२३६ मुलांची घरवापसी
मध्य रेल्वेकडून १२३६ मुलांची घरवापसी

मध्य रेल्वेकडून १२३६ मुलांची घरवापसी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० : मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाने पोलिस दलाच्या मदतीने ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’अंतर्गत गेल्या १० महिन्यांत १२३६ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ८२२ मुले आणि ४१४ मुलींचा समावेश आहे. या मोहिमेसाठी रेल्वे पोलिसांना ‘चाईल्ड लाईन’ स्वयंसेवी संस्थेची मदत झाली.

रेल्वे सुरक्षा बलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत हरवलेल्या/ घरातून पळून आलेल्या मुलांची सुटका केली जाते. देशभरातील अनेक मुले मुंबईचे असलेले आकर्षण, कौटुंबिक कलह, भांडण तसेच चांगल्या आयुष्याच्या शोधात कुटुंबीयांना न सांगता मुंबईत येतात. मुंबईतील अनेक रेल्वेस्थानकांवर ही मुले आरपीएफ कर्मचाऱ्यांना सापडतात. यंदा ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’अंतर्गत आरपीएफने जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेवरील विविध स्थानकांतून एक हजार २३६ मुलांची सुटका केली.

कोणत्या भागात किती मुले
विभाग मुले मुली एकूण
मुंबई ३७८ १६१ ५३९
भुसावळ १३८ ११९ २५७
पुणे १९६ ५० २४५
नागपूर ७८ ६४ १४२
सोलापूर ३३ २० ५३