खडवलीत २८ वीज चोरांविराधोत कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खडवलीत २८ वीज चोरांविराधोत कारवाई
खडवलीत २८ वीज चोरांविराधोत कारवाई

खडवलीत २८ वीज चोरांविराधोत कारवाई

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १० : टिटवाळा उपविभागातील २८ वीज चोरांविरोधात महावितरणने धडक कारवाई केली आहे. १९ लाख ६४ हजारांची वीज चोरी यांनी केली असून याप्रकरणी मुरबाड पोलिस ठाण्यात वीज चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या खडवली शाखा कार्यालयांतर्गत शिवाजी चौक, स्वामी समर्थ मंदिर परिसर, एकता चाळ, जांभूळपाडा, खारपे चाळ, खडवली पूर्व व पश्चिम, राये रोड आदी भागांत महावितरणच्या पथकाने ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी केली. या वेळी २८ जणांनी वीज मीटरमध्ये येणाऱ्या केबलला टॅपिंग करत वीज चोरी करत वापर सुरू असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. वीजचोरीचे देयक व दंडाची रक्कम विहित मुदतीत भरली नाही. कल्याण मंडळ दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता गणेश पवार, कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे व त्यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. या सर्वांविरोधात कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे यांच्या फिर्यादीवरून मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.