एपीएमसीत वाढीव जागेत अतिक्रमण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एपीएमसीत वाढीव जागेत अतिक्रमण
एपीएमसीत वाढीव जागेत अतिक्रमण

एपीएमसीत वाढीव जागेत अतिक्रमण

sakal_logo
By

एपीएमसीत वाढीव जागेत अतिक्रमण
तुर्भे, ता 10(बातमीदार):-एपीएमसीमध्ये दुकानदारांचा वाढीव जागेचा वापर सरस सर्रासपणे सुरू आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम, फेरीवले,मार्जिनल जागेचा वापर करणाऱ्या दुकान धारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र एपीएमसी मार्केट मधील व्यापाऱ्यांनी वाढीव जागेत ही अतिक्रमण केल्याने राहदारीला अडथळा तर होतच आहे पण वाहतूक कोंडी देखील होत आहे.परंतु एपीएमसी से.19 येथील माथाडी भवन बाजार आवार व जलाराम मार्केट मध्ये देखील वाढीव जागेचा वापर सुरूच आहे. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात मार्जिनल जागेचा वापर करण्यावर कारवाईचा बडगा उगारला होता,त्यावेळी येथील अनधिकृत जागेच्या वापरावर लगाम लागला होता. परंतु आता याठिकाणी महालपालिकेचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.त्यामुळे याठिकाणी पून्हा मार्जिनल जागेचा वारेमाप वापर करण्यास सुरुवात झालेली आहे.
सणासुदीला तर अश्या वाढीव जागेतील अतिक्रमणामुळे नागरिकांना दे धक्का करत चालावे लागते.संबंधित विभागाकडून वारंवार कारवाई केली जाते मात्र कारवाई नंतर काही तासातच पुन्हा वाढीव जागेत अतिक्रमण केले जाते.
त्यात एपीएमसी माथाडी भवन येथील बाजारात आधीच पार्किंगची समस्या उद्भवत आहे. या परिसरातील रस्ता हा पाचही बाजाराला जोडला गेला आहे. त्यामुळे याठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामध्ये रस्त्यावर दोन ते तीन लेन अनधिकृत पार्किंगचा विळखा असतो. अशातच येथील व्यापारी दुकान धारक आपला बाजार वाढीव जागेत मांडून ठेवतात. याठिकाणी विद्युत रोषणाईचे सामान, किराणा बाजार, करकोळ बाजार, घरगुती वापरतील वस्तु असे अनेक प्रकारचे दुकान आहेत. मात्र ही मंडळी त्यांचे सामान अधिक जागेत पसरवून ठेवून मार्जिनल जागेचा वापर करीत आहेत. रस्त्यालगत पार्किंग व फुटपाथाला लागून व्यापाऱ्यांचे बस्तान यामुळे पादचाऱ्यांना फुटपाथवरुन जाताना त्रास सहन करावा लागत आहे. तुर्भे विभाग कार्यालयाकडून कारवाईची पाठ फिरल्याचे निदर्शनास येत आहे.
त्यात माथाडी भवन पासूनच्या फूथपाथवर फेरीवाले देखील आपले बस्तान ठोकून असतात.सिग्नल पासून ते माथाडी भवन पर्यंत असणारे पदपथ हे कायम किरकोळ फेरीवाल्यांन च्या गराड्यात अडकून पडलेले असते.भाजी ,फळे विक्रेते बसतात .माल संपला की उर्वरित कचरा तसाच टाकून निघून जातात.मात्र यांच्यावर कारवाई होत नाही हा प्रकार वर्षानुवर्षे तसाच सुरू आहे.काही फेरीवाल्यां संघटना देखील आपल्या मर्जीतील लोकांना व्यवसाय करण्यासाठी बसवतात.कारवाई केली की संबंधित विभागाच्या विरोधात मोर्चे आंदोलने करतात.तसेच कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या मनपाच्या कर्मचाऱ्यांना फेरीवाक्यच्या दादागिरी चा देखील त्रास सहन करावा लागतो.
कोट
आमच्या विभागाकडून कारवाई ही होत च असते .कारवाई नंतर ते पुन्हा सामान ठेवतात.यापुठे दैनंदीन कारवाई केली जाईल.तसेच वारंवार त्याना समज ही दिला जातो.
सुखदेव येडवे ,सह्ययक आयुक्त ,तुर्भे विभाग