क्रिकेटपटू वसंत धानिपकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिकेटपटू वसंत धानिपकर यांचे निधन
क्रिकेटपटू वसंत धानिपकर यांचे निधन

क्रिकेटपटू वसंत धानिपकर यांचे निधन

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १० (बातमीदार) : क्रिकेटपटू वसंत धानिपकर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी बुधवारी (ता. ९) अंबरनाथमध्ये निधन झाले. शिवाजीनगर येथील स्मशानभूमीत गुरुवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. गजानन धानिपकर, एक मुलगी, नातू असा परिवार आहे. धरमसी मोरारजीसाठी टाइम्स शिल्ड आणि कांगा ए डिव्हिजन लीगसाठी दोन दशकांहून अधिक काळ ते प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते.

डावखुरे लेग ऑफ स्पिनर गोलंदाज अशी ओळख असलेल्या धानिपकर यांनी १९८४-८५ मध्ये झालेल्या पुरुषोत्तम करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम केला होता. रवी शास्त्री, संदीप पाटील, संजय मांजरेकर, एकनाथ सोलकर, पद्माकर शिवलकर, बलविंदर सिंग संधू अशा दिग्गज क्रिकेट खेळाडूंसमवेत ते क्रिकेट खेळले होते. त्या काळात धानिपकर यांच्या नावावर अनेक विकेट घेण्याचा आणि हॅट्‍ट्रिची नोंद झाली होती. शालेय जीवनापासून कसोटीपटू अजिंक्य रहाणे याला त्यांचा अभिमान वाटत होता. अनेकांनी त्यांचे मार्गदर्शन घेतले होते.

अंबरनाथमधील अल्बर्ट मोरारजी या कंपनीत धानिपकर नोकरीला होते. अनेक क्रिकेटपटू घडवणाऱ्या धानिपकर यांचे अंबरनाथमध्ये क्रिकेट ॲकॅडमी सुरू करण्याचे स्वप्न होते. माजी नगराध्यक्षा संपदा गडकरी यांच्या प्रयत्नातून साई क्रिकेट ॲकॅडमी सुरू करण्यात आली होती. प्रमोद पाटील आणि सिने अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते धानिपकर यांना कानसई भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.