मुंबईत १२ डिसेंबरपर्यंत ड्रोनबंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत १२ डिसेंबरपर्यंत ड्रोनबंदी
मुंबईत १२ डिसेंबरपर्यंत ड्रोनबंदी

मुंबईत १२ डिसेंबरपर्यंत ड्रोनबंदी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० : संभाव्य दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेता शहरात ड्रोनबंदीचे आदेश पोलिस आयुक्त मुख्यालयातून जारी करण्यात आले आहेत. यात १२ डिसेंबरपर्यंत ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट्स, पॅरा-ग्लाइडर्स, पॅरा मोटर्स, हँग ग्लायडर आदी उड्डाण क्षमता असलेली संयंत्रे उडवण्यावर बंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर भारतीय दंडसंहिता कलम १८३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांनी घातलेली बंदी पुढील ३० दिवसांसाठी म्हणजेच १३ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीसाठी राहणार आहे. मुंबई पोलिसांकडून हवाई पाळतीसाठी वापरण्यात येणारे ड्रोन या आदेशाला अपवाद आहेत. असामाजिक घटक, दहशतवादी ड्रोन आणि इतर उडणाऱ्या वस्तूंचा वापर करून जनतेच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करत कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकतात. अशा घटकांच्या कारवायांना राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि सक्रिय उपाय आवश्यक असल्यामुळे या उपाययोजना करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.