चित्रपट, नाट्यगृहांच्या मनोरंजन करामध्‍ये लवकरच वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रपट, नाट्यगृहांच्या मनोरंजन करामध्‍ये लवकरच वाढ
चित्रपट, नाट्यगृहांच्या मनोरंजन करामध्‍ये लवकरच वाढ

चित्रपट, नाट्यगृहांच्या मनोरंजन करामध्‍ये लवकरच वाढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबई महापालिकेकडून दरवर्षी मनोरंजन करामध्ये सुधारणा करण्यात येते. मुंबई महापालिका आगामी वर्षासाठी चित्रपटगृह आणि नाट्यगृहांच्‍या मनोरंजन करात वाढ करणार आहे. या मनोरंजन करवाढीचा प्रस्ताव आता पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतरच नव्याने कर आकारणीसाठीच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार हे दर निश्चित केलेल्या दरांपेक्षा अधिक अंमलात आणता येत नाहीत. त्यामुळेच नव्या दरांचा प्रस्ताव लवकरच पालिकेकडून मंजूर होण्याची शक्यता आहे. मुंबईत चित्रपटगृह, नाट्यगृह, सर्कस यांसारख्या गोष्टींसाठी मनोरंजन कर हा पालिकेकडून आकारण्यात येतो. आर्थिक वर्ष २०१५-१६ साठी या करामध्ये १० टक्के वाढीचा प्रस्ताव पालिकेने मंजूर केला होता. पालिकेने हा प्रस्ताव नगरविकासाची परवानगी मिळाल्यावर संमत केला होता; परंतु गेल्या काही वर्षांत कोरोनाच्या कालावधीमुळे राज्य सरकारने या कर वसुलीसाठी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे पालिका आताही २०१५-१६ च्या वर्षानुसारच मनोरंजन करवसुली करत आहे; मात्र पालिकेने पुन्हा एकदा या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासाठीची सुरुवात केली आहे.
पालिकेच्या प्रस्तावानुसार २०२३ ते २०२४ या कालावधीत शेड्युल्ड ग्रुप सीमध्ये जुन्या दरानुसार चित्रपटगृहाचा कर निश्चित करण्यासाठीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये २०२२-२३ मध्ये मुंबईत प्रदर्शित झालेली मराठी, गुजराती चित्रपट, मराठी नाटक, मोनोलॉग यासाठी सूट देण्यात आली होती. त्यामुळे २०१५ च्या आधारावर सुधारित दरपत्रकाला मंजुरी मिळाल्यास नवे दर लवकरच लागू होतील.