फुकट्या प्रवाशांकडून ११४ कोटी दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुकट्या प्रवाशांकडून ११४ कोटी दंड
फुकट्या प्रवाशांकडून ११४ कोटी दंड

फुकट्या प्रवाशांकडून ११४ कोटी दंड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : पश्चिम रेल्वेने विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय लोकल गाड्या, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत गेल्या सात महिन्यांत पश्चिम रेल्वेने १६.७८ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत ११४ कोटींपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेचा तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या सात महिन्यांत १६.७८ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. या कारवाईत ११४.१८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. ऑक्टोबर या महिन्यात पश्चिम रेल्वेने बुक न केलेल्या सामानासह विनातिकीट, अनियमित प्रवासाच्या २.३८ लाख प्रकरणांद्वारे १७ कोटींचा महसूल मिळविला आहे. एप्रिल-ऑक्टोबर २०२२ या कालावधीत  विनातिकीट, अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण  १६.७८ लाख प्रकरणे आढळून आली आहेत, तर मागील वर्षी याच कालावधीत ६.७९ लाख प्रकरणे आढळून आली. त्यांच्याकडून ३६.५७ कोटींचा दंड वसूल करण्यात आला होता. त्या तुलनेत २१२ टक्के वाढ झाली आहे.