डोंबिवलीत महिला पोलिसाला शिवीगाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीत महिला पोलिसाला शिवीगाळ
डोंबिवलीत महिला पोलिसाला शिवीगाळ

डोंबिवलीत महिला पोलिसाला शिवीगाळ

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १० : विष्णूनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रार अर्जाची विचारणा करण्यास आलेल्या एका महिलेने पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या वर्दीवर हात टाकत त्यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोनू नाईक, तिचे वडील भरत नाईक व रेखा रेडकर यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली येथे राहणारी सोनू नाईक ही बुधवारी दुपारी वडिलांसह विष्णूनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रार अर्जाचे काय झाले, याची विचारणा करण्यास गेली होती. या वेळी कर्तव्यावर पोलिस उपनिरीक्षक मोहिनी कपिले यांच्याकडे सोनूने विचारणा केली असता तुम्ही थोडा वेळ थांबा माहिती घेऊन सांगते, असे त्यांनी सांगितले. याचा राग आल्याने सोनू भडकली. तिने कपिले यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सोनू व तिच्या वडिलांनी तक्रार केलेल्या व्यक्तीला आता अटक करा, असे सांगत पोलिसांशी हुज्जत घातली. या वेळी झालेल्या झटापटीत कपिले यांच्या वर्दीवर हात टाकत त्यांची नेम प्लेट तोडली. त्यानंतर ती पोलिस ठाण्यातून निघून गेली. त्यानंतर सायंकाळी सोनू ही वडील रेखा रेडकर यांना सोबत घेऊन आल्या. त्यांनी पोलिस ठाण्यात महिलांना न्याय मिळत नाही, तक्रार नोंदवली जात नाही, मारहाण होते असे म्हणत आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करत कपिले यांना शिवीगाळ केली. रेखा रेडकर या आप जनता पार्टीच्या डोंबिवली शहर अध्यक्ष असून त्यांनी समाजमाध्यमावर व्हिडीओ प्रसारित केला आहे. तसेच खोट्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केल्याचे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.