वसईत राहत्या घरात महिलेचा मृतदेह सापडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत राहत्या घरात महिलेचा मृतदेह सापडला
वसईत राहत्या घरात महिलेचा मृतदेह सापडला

वसईत राहत्या घरात महिलेचा मृतदेह सापडला

sakal_logo
By

नालासोपारा, ता. ११ (बातमीदार) : वसईत राहत्या घरातच एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. कामावर गेलेले घरातील लोक घरी परतल्यानंतर ही घटना उघड झाली. वसई पश्चिमेच्या वसंत मंदिर या परिसरात गुरुवारी (ता. १०) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना समोर आली. घरातील फरशीवर पाणी पडल्याने पाय घसरून पडली असावी आणि त्यात डोक्याला गंभीर मार लागून तिचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. याबाबत माणिकपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ममता भट (वय ४०) असे महिलेचे नाव आहे. वसईच्या वसंत मंदिर बिल्डिंगमध्ये भट्ट हे कुटुंब राहते. भट्ट कुटुंबाबरोबर ममता भट्ट ही अविवाहित बहीणही राहत होती. गुरुवारी नेहमीप्रमाणे घरातील पती-पत्नी कामावर गेले होते. आठ वाजता कामावर गेलेले दोघेही परतले. त्यांनी चावी बनवणाऱ्याच्या मदतीने दरवाजा उघडला, तेव्हा या महिलेचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळला.