ठाण्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा
ठाण्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा

ठाण्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : डिसेंबर २०२२ अखेर मुदत संपुष्टात येणाऱ्या जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार चार तालुक्यांतील १३६ प्रभागांसाठी या निवडणुका पार पडणार आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक पार पडल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले होते. त्यानंतर आता पुन्हा ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

ठाणे, कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी आणि अंबरनाथ या तालुक्यांत १५८ ग्रामपंचायतींचा निवडणूक काही महिन्यांपूर्वी पार पडल्या. त्यानंतर आता ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपुष्टात येणाऱ्या कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये ४२ ग्रामपंचायतींच्या १३६ प्रभागातील ३६० जागांसाठी ही निवडणूक होणार असून यामध्ये सरपंचपदाची थेट निवड होणार आहे. यामध्ये कल्याण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायती; तर शहापूरमधील पाच, भिवंडी आणि मुरबाडमधील प्रत्येकी १४ ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

१८ डिसेंबर रोजी मतदान
२८ नोव्हेंबर ते दोन डिसेंबर २०२२ या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ असेल. दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी ५ डिसेंबर रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ७ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. त्यानंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हवाटप होईल. १८ डिसेंबर रोजी मतदान; तर २० डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत.

शहापूर
कानवे, बाभाळे, चिखलगाव, लवले, नादवळ