रस्ता कामाला विलंब होत असल्याने आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता कामाला विलंब होत असल्याने आंदोलन
रस्ता कामाला विलंब होत असल्याने आंदोलन

रस्ता कामाला विलंब होत असल्याने आंदोलन

sakal_logo
By

शहापूर, ता. ११ (बातमीदार) : शहापूर-लेनाड-मुरबाड रस्त्याचे काम अपूर्ण आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, म्हणून शुक्रवारी (ता. ११) खुटघरजवळ सर्वपक्षीयांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य रस्ते व विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संदीप पाटील यांनी रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना कंत्राटदारांना दिल्याचे लेखी आश्वासन दिल्यावर जनआंदोलन मागे घेण्यात आले. शहापूर-लेनाड-मुरबाड हा रस्ता पूर्वी रुंदीचा होता, तेवढाच करून द्यावा, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस साईडपट्टी पूर्ण करणे व सफेद पट्टे मारणे, दिशादर्शक फलक लावणे, पूल सुस्थितीत बनवणे, दोन्ही बाजूंचे प्रवासी थांबे पूर्ववत करून द्यावे, सार्वजनिक मालमत्ता बाधित झाल्या आहेत, त्या तत्काळ पूर्ववत करून द्यावेत, शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत, त्यांना योग्य तो मोबदला त्वरित देण्यात यावा, आदी मागण्यांचा समावेश महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.