मुंबई विमातळावरील सलून सुसाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विमातळावरील सलून सुसाट
मुंबई विमातळावरील सलून सुसाट

मुंबई विमातळावरील सलून सुसाट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक्‍स्‍प्रेस ब्युटी आणि ग्रुमिंग सेवा प्रदान करणाऱ्या एनएस स्टाईल सलूनने प्रतिदिन सरासरी १५ ते २० हजार रुपयांच्‍या विक्रीच्‍या तुलनेत एकाच दिवसांत १ लाख रुपयाच्‍या विक्रमी कमाईची नोंद केली. २०२१च्या तुलनेत २०२२ मध्ये सलूनचे उत्पन्न ४०० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वाढ दिसून येत आहे.

शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. परिणामी विमानतळावरावरील सलूनचा व्यवसाय वाढला आहे. साधारणतः प्रतिदिन एनएस स्टाईल सलूनचा व्यवसाय १५ ते २० हजार रुपये प्रतिदिन होतो; मात्र ४ नोव्हेंबर २०२२ रोजी एकाच दिवसात स्टाईल सलूनने १ लाख रुपयांच्‍या विक्रमी कमाईची नोंद केली. सनी लिओन, राधिका मदन, नोरा फतेही, निक्की तांबोळी, काजल अग्रवाल, अनुषा दांडेकर, राखी सावंत, माहिरा मिश्रा, श्रद्धा आर्य यांसारख्या सेलिब्रिटीज विमानतळावरील सलूनला भेट देणारे नियमित ग्राहक आहे.
.......
सलूनचे ६५ टक्के ग्राहक पुरुष
एनएस सलूनच्या ग्राहक वर्गामध्ये ६५ टक्‍के पुरुष आणि ३५ टक्‍के महिला आहेत, ज्यात २० ते ३० ग्राहक नियमित भेट देतात आणि ९५ टक्‍के देशांतर्गत व ५ टक्‍के आंतरराष्ट्रीय प्रवासी असतात. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार हे सलून कार्यसंचालनांच्‍या सर्व मानक कार्यप्रणालींचे पालन करते. एनएस स्टाईल सलून टर्मिनल १-सी, प्रस्थान, गेट २६ समोर असून दुसरे सलून टर्मिनल २, डोमेस्टिक डिपार्चर, आयरिश कॅफेच्या पुढे आहे.
........
या आहेत सुविधा
या सलूनमध्ये बॉडी मसाज, चेअरद्वारे मसाजची सुविधा, फिजिओथेरपिस्टद्वारे फिजिओथेरपी, सलूनमध्ये केशभूषा, दाढी, फेशियल पेडीक्योर, मॅनिक्युअर, हेअर कटिंगची सुविधा प्रवाशांना पुरवण्यात येत आहे.