अभिनेता सिद्धांत वीर सुर्यवंशी यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेता सिद्धांत वीर सुर्यवंशी यांचे निधन
अभिनेता सिद्धांत वीर सुर्यवंशी यांचे निधन

अभिनेता सिद्धांत वीर सुर्यवंशी यांचे निधन

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : छोट्या पडद्यावर काम करणारा अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचे वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झाले. जिममध्ये वर्कआऊट करताना अचानक तो खाली कोसळला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि त्यांची दोन मुले असा परिवार आहे. अभिनेता जय भानुशाली आणि क्रिकेटपटू व अभिनेता सलील अंकोलानेही सिद्धांतच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
सिद्धांतने मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने कुसुम या मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होतो. त्याने अनेक शोमध्ये मुख्य भूमिकाही साकारल्या आहेत. कसौटी जिंदगी की, कृष्णा अर्जुन, क्या दिल में है यांसारख्या मालिकांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या शेवटच्या प्रोजेक्ट्समध्ये क्यूँ रिश्तों में कट्टी बट्टी आणि जिद्दी दिल या टीव्ही शोचा समावेश आहे.