मुंबई ते गोरखपूर दरम्यान विशेष गाड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई ते गोरखपूर दरम्यान विशेष गाड्या
मुंबई ते गोरखपूर दरम्यान विशेष गाड्या

मुंबई ते गोरखपूर दरम्यान विशेष गाड्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : पश्चिम रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन वांद्रे टर्मिनस ते गोरखपूर दरम्यान दोन विशेष गाड्या चालवण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते गोरखपूरपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०५०५४ वांद्रे टर्मिनस- गोरखपूर स्पेशल ट्रेन गुरुवारी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी वांद्रे टर्मिनसवरून सायंकाळी ५.१५ वाजता सुटेल आणि शनिवारी सकाळी ६.२५ वाजता गोरखपूरला पोहोचेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०५०५३ गोरखपूर- वांद्रे टर्मिनस स्पेशल ही ट्रेन बुधवार, १६ नोव्हेंबर २०२२ रोजी गोरखपूर स्थानकांवरून पहाटे ०४.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.०० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. या दोन्ही ट्रेन बोरिवली, वापी, सूरत, भरूच, वडोदरा, रतलाम, कोटा, गंगापूर सिटी, भरतपूर, अछनेरा, मथुरा, कासगंज, फरूखाबाद, कन्नौज, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, गोंडा, बस्ती आणि खलिलाबाद स्थानकांवर थांबणार आहे. या ट्रेन क्रमांक ०५०५३/०५०५४ या विशेष गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कासह बुकिंग शनिवारपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.